उदगीर - जळकोट तालुक्यातील 15 गावातील सिमेंट रस्ते करण्यासाठी मनरेगा योजनेतून 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर
माजी रोजगार हमी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश
उदगीर : उदगीर जळकोट मतदार संघातील एकूण 15 गावातील गावांतर्गत सिमेंट काँक्रीट व पेवर ब्लॉक रस्ता करण्याकरिता माजी रोजगार हमी राज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली.
उदगीर - जळकोट मतदार संघात विविध योजनेतून आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आमदार संजय बनसोडे हे सतत प्रयत्नशील असतात त्यामध्ये उदगीर व जळकोट तालुक्यातील 15 गावांमध्ये गावअंतर्गत सिमेंट रस्ते व पेवर ब्लॉक करण्यासाठी शासनाकडून १ कोटी ८० लाख रुपयाचा निधी आमदार संजय बनसोडे यांनी मंजूर करून घेतल्याने उदगीर जळकोट मतदार संघातील नागरिकांच्या वतीने आमदार संजय बनसोडे यांचे अभिनंदन होत आहे.
उदगीर जळकोट तालुक्यातील पंधरा गावांमध्ये लाखो रुपयांचा निधी आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये जळकोट तालुक्यातील चेरा या गावातील गावअंतर्गत सिमेंट काँक्रीटचा रस्ता व पेव्हर ब्लॉक करण्याकरिता १० लाख रुपये, तिवटग्याळ ता.उदगीर या गावातील गावअंतर्गत सिमेंट काँक्रीटचा रस्ता व पेव्हर ब्लॉक करण्याकरिता १० लाख रुपये, धामणगाव ता. जळकोट २० लाख रुपये, बोरगाव ता. जळकोट १० लाख रुपये, मंगरूळ ता. जळकोट १० लाख रुपये, मरसांगवी ता. जळकोट १० लाख रुपये, येलदरा ता. जळकोट १० लाख रुपये,येवरी ता. जळकोट १० लाख रुपये, राठोड तांडा ता. जळकोट १० लाख रुपये, रावणकोळा ता. जळकोट १० लाख रुपये, वायगाव ता. उदगीर १० लाख रुपये, विराळ ता. जळकोट १० लाख रुपये, शेकापुर ता. उदगीर १० लाख रुपये, सुल्लाळी ता. जळकोट १० लाख रुपये, निडेबन ता.उदगीर ३० लाख रुपये अशा तब्बल १५ गावासाठी १ कोटी ८० लाख रुपयाचा निधी आ.संजय बनसोडे यांनी मंजूर करुन घेतला असल्याने संबंधित गावातील ग्रामस्थातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments