सौ.अनिता येलमट्टे यांचा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने सत्कार
उदगीर : येथील लेखिका उपक्रमशील शिक्षिका सौ.अनिता येलमट्टे यांना नुकताच मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री
मंगल प्रभात लोढा,शिक्षण मंत्री दिपक केसरकर, शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल, कौस्तुभ दिवेगावकर,कैलास पगारे, आ.कपिल पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे व संचालिका सौ. संगीता पटणे यांनी सौ.अनिता येलमट्टे यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.
0 Comments