अनिता येलमटे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त
उदगीर : येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील अनिता येलमटे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला .याप्रसंगी पर्यटन व महिला बालविकास मंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,शिक्षक आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव रणजीतसिंग देओल,शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे,शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्रमुख कौस्तुभ दिवेगावकर ,शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील,शरद गोसावी,विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या वाचनलेखन चळवळीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या व विविध सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीत सक्रीय राहणाऱ्या अनिता यलमटे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments