GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लोणी ग्रामपंचायतीची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी

लोणी ग्रामपंचायतीची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी

ग्रामसेवक व सरपंचांनी ग्राम निधीच्या खात्यामधील लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप

जनस्तंभ न्यूज नेटवर्क

उदगीर : शहरापासून जवळच असलेल्या उदगीर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक व सरपंचांनी संगणमत करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार लोणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैजनाथ बिरादार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणी हे गाव उदगीर शहरापासून जवळच असल्याने  या परिसरात एमआयडीसी व दाल इंडस्ट्रीज असल्याकारणाने या भागात टॅक्स रूपाने लाखो रुपये जमा होतात विविध कामांमध्ये व गावच्या छोट्या मोठ्या कामांमध्ये संबंधित कर्तव्यावर असणारे ग्रामसेवक जाधव एस.एस. हे पैसे मागत असल्याची तक्रार उपसरपंच वैजनाथ बिरादार यांनी वेळोवेळी तोंडी केली होती मात्र त्याची दखल घेतली नसल्याने त्यांनी लेखी तक्रार उदगीर येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे केली असून या ग्रामसेवकाची तात्काळ चौकशी करून त्यांच्यासोबत त्यांना साथ देणारे सरपंच यांनाही ग्रामसेवकांनी सोबत घेत 
ग्राम निधीच्या खात्यामधील लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. त्यांच्या या निवेदनाची दखल घेवुन गटविकास अधिकारी सुळे यांनी दि. 23 फेब्रुवारी रोजी  संबंधित ग्रामसेवक जाधव एस. एस. व लोणीचे सरपंच यांची चौकशी करण्याचे आदेश एका लेखी पत्राद्वारे काढले आहेत.
गोरगरीब जनतेच्या कामासाठी ग्रामसेवकाची नियुक्ती केली जाते मात्र रहिवासी दाखला ते घरकुलाच्या बिलापर्यंतची कागदपत्रे देण्यासाठी संबंधित ग्रामसेवक पैशाची मागणी करत असल्याची तक्रार आता लोणी येथील ग्रामस्थ करत आहेत. यापूर्वी संबंधित ग्रामसेवक निडेबन येथे झालेल्या घरकुलाच्या कामात पैशाची मागणी केली होती अशी चर्चा झाल्यानेच त्यांची तेथून बदली केली असल्याचे काही सुजाण नागरिकांतून बोलले जात आहे. अशा भ्रष्ट ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करून त्याची चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments