GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

तिवटग्याळ पाटी उदगीर रस्त्याचे काम चार महिन्यात पूर्ण करण्याचे आ.संजय बनसोडे यांचे निर्देश

तिवटग्याळ पाटी उदगीर रस्त्याचे काम चार महिन्यात पूर्ण करण्याचे आ.संजय बनसोडे यांचे निर्देश 

तिवटग्याळ पाटी ते रिंगरोड पर्यंतच्या चार पदरी रस्त्याची आमदार संजय बनसोडे यांनी केली पाहणी

उदगीर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आमदार संजय बनसोडे यांनी विशेष बाब म्हणून मंजूर करून घेतलेल्या तिवटग्याळ पाटी- ते रिंग रोड या बायपास रस्त्यासाठी जवळपास ७० कोटी रुपये मंजुर करुन घेतले होते. त्या कामाची काल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी पाहणी केली. 
यावेळी सदर काम युद्ध पातळीवर काम सुरू असून चार महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने आष्टा गाव ते तिवटग्याळ पाटी पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला आहे. उर्वरित आष्टा मोड ते आष्टा व तिवटग्याळ पाटी ते उदगीर या कामासाठी आमदार संजय बनसोडे यांनी विशेष प्रयत्न करून केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडून ७० कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर करून घेतला होता या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे.
तीवटग्याळ पाटी ते उदगीर हा रस्ता चौपदरी करण्यात येत आहे.या रस्त्यावर असलेल्या मानमोडी पूलाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. पर्यायी रस्ता निर्माण करून टप्प्याटप्प्याने या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. हे काम चार महिन्यात व गुणवत्तापूर्वक करण्याचे निर्देश यावेळी आमदार बनसोडे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. यावेळी माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, मुकेश भालेराव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता, तिवटग्याळचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments