खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते
खा. शरदचंद्र पवार यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उदगीर जळकोट, राष्ट्रवादी डाॅक्टर्स सेल उदगीर तालुका व राष्ट्रवादी युवक उदगीर शहर व तालुका यांच्या समन्वयाने उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय उदगीर येथे मोफत नेत्रतपासणी व अत्यल्प दरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराचे उद्घाटन माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी उदयगिरी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, युवक प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, माजी सभापती तथा उदगीरचे तालुका अध्यक्ष शिवाजी मुळे,
शहराध्यक्ष समीर शेख, अर्जुन आगलावे , यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या शिबिराचा सर्वानी लाभ घ्यावा व नेत्र तपासणी करून घ्यावी असे आवाहन उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे व्यवस्थापन डॉ. लखोटीया, आयोजक चंदन पाटील नागराळकर, डाॅक्टर सेलच्या तालुकाध्यक्षा डॉ. भाग्यश्री घाळे, अजय शेटकार यांनी केले आहे.
0 Comments