उदगीर मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला : माजी मंत्री आमदार संजय बनसोडे
शेवटच्या घटकाचा विकास होईपर्यंत मी सदैव आपल्या सेवेत राहणार
उदगीर : मतदार संघातील हेर हे गाव जुने असून या गावचा म्हणावा तसा विकास झाला नाही गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पाणीटंचाईची समस्या असल्याचे येथील ग्रामस्थांनी मला वारंवार सांगितले असून माझ्या माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यांची सोय व्हावी म्हणून आपण जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची योजना आणली या योजनेअंतर्गत हेर गावासाठी पाणीपुरवठ्याच्या कामासाठी जवळपास २ कोटी १५ लाख रुपयाचा निधी मंजूर करून आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत जेणेकरून भविष्यकाळात पिण्याच्या पाण्यापासून एकही घर वंचित राहणार नाही यासाठी माझा प्रयत्न असून मी आमदार झाल्यापासून उदगीर मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर तालुक्यातील हेर येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी सभापती सोपानराव ढगे, बाळासाहेब मरलापल्ले, हेरचे उपसरपंच तुळशीराम बेंबडे, रामेश्वर बिरादार जकनाळकर, माजी सरपंच पंडितराव ढगे, बालाजी गुरुडे, दत्ता माटेकर, अविनाश सुर्यवंशी, राज चौंडे, गंगाधर स्वामी बक्षु पठाण, बाबासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी पाणीपुरवठा मंत्री आ.संजय बनसोडे यांनी , आपल्या हेर गावात
जलजीवन मिशन अंतर्गंत १ कोटी ७५ लक्ष रुपाये मंजूर केले असुन सदर पाणी पुरवठा योजना ही २ महिन्यात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
माझ्या मतदार संघातील पाणीटंचाई दुर व्हावी म्हणून जवळपास ६०० कोटी रुपयाची वाटरग्रीड योजना मंजूर केली. मतदार संघातील ग्रामस्थांना भविष्यात पाणीटंचाई भासु नये म्हणून वाटर ग्रीड योजना आपण आणली आहे. आजपर्यंत ही योजना फक्त महाराष्ट्रात परतुरला होती. मी पाणीपुरवठा मंत्री असताना आपल्या मतदार संघातील जनतेच्या सेवेकरीता ही वाटरग्रीड योजना मंजूर केली होती. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बारुर येथील धरणातुन आपण पाणी आणणार असुन ही योजना पूर्ण झाल्यास मतदार संघातील एक ही घर पाणीटंचाईपासुन वंचित राहणार नाही. ज्यामध्ये प्रत्येक कुंटुंबाला ५५ लिटर प्रमाणे पाणी देणार असल्याचा आपला मानस आहे म्हणून भविष्यात कुणालाही पाणीटंचाईच्या झळा पोहोचणार नाही यासाठी आपण काळजी घेत आहोत.
आपल्या हेर गावच्या विकासासाठी मूलभूत सुविधा योजने अंतर्गत १५ लाख रुपयाच्या वाघोबा मंदिर सभागृह बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला तर २० लाख रुपये मातंग समाजाच्या सभागृह बांधकामासाठी व बौद्ध विहारासाठी १० लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे अशा विविध योजनेच्या माध्यमातून हेर गावासाठी पाणीपुरवठ्याची योजना सोडून इतर ३ कोटी ४२ लाख रुपयाचा निधी केवळ आपल्या गावाच्या विकासासाठी मी दिला आहे.
मी आमदार आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने झालो आहे त्यामुळे मी माझ्या आई - वडिलांच्या नंतर केवळ मतदारांना मानतो म्हणून मी आपला लोकसेवक म्हणून काम करत असल्याचे भावनिक उद्गार आ.बनसोडे यांनी यावेळी काढले.
आपण समाजकारण व राजकारणात
१९९० पासून देशाचे नेते शरदचंद्र पवार,
शिवराज पाटील चाकुरकर, विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवुन मी आपल्या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहे.
गेली ३३ वर्ष झाले मी राजकारणात सक्रिय असुन सर्व जातीधर्माचे लोक एकत्र यावे म्हणून आपल्याला विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली. त्यामुळेच मी आज आपला आमदार म्हणुन काम करत आहे हे विसरून चालणार नाही म्हणून मागासवर्गीय समाजाचा ही विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी आमदार झाल्यापासुन उदगीर मतदार संघाचा मास्टर प्लाॅन तयार करुन माझ्या कामाची सुरूवात केली आहे. उदगीर मतदार संघातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणजे उदगीर परिसरात २०८ हेक्टरवर एम.आय.डी. सी मंजूर केली आहे जेणेकरुन या भागातील रोजगाराचा प्रश्न मिटेल. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती व्हावी म्हणून माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उदगीर तालुक्यातील तिरु नदीवर ७ बॅरेजेस विशेष बाब मंजूर करुन घेतले त्याचे काम ही चालु असुन या बेरजेसमुळे ६० कि.मी. पर्यंत म्हणजे गव्हाण ते हंडरगुळी या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती होईल.
उदगीर शहरात गुलबर्गाच्या धरतीवर १२ कोटी रुपयाचे दर्जेदार बौद्ध विहार आपण बांधत आहोत तर रात्रंदिवस आपली सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांच्या निवासासाठी पोलीस वसाहत मंजूर करून त्यासाठी ६० कोटी रुपये मंजुर केले आहेत त्याचे काम लवकरच सुरू होईल.मतदार संघात ५ उपकेंद्र मंजुर केले म्हणून आपण सर्वांनी येत्या काळात काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक दिलीपराव बिरादार यांनी केले. सूत्रसंचालन विलास कांबळे यांनी केले तर आभार पंडित ढगे यांनी मानले. या कार्यक्रमास हेर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
२८८ आमदारांपैकी पहिल्या टाॅप टेन आमदारांपैकी एक आ.संजय बनसोडे ....
महाराष्ट्रात २८८ आमदार आहेत मात्र विकासाने झपाटलेले एकमेव आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आमदार संजय बनसोडे यांची एक नवी ओळख आहे. कारण २८८ आमदारांपैकी टाॅप टेनमधील नंबर एकचे आमदार म्हणून आपले संजय बनसोडे आहेत त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे असा आमदार मतदार संघाला भाग्याने मिळतो ते नेहमी जातीधर्मापलिकडे जावून काम करतात. आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान केवळ आ.संजय बनसोडे यांच्यामुळेच मिळाले असुन मतदार संघाचा कायापालट करणारा उदगीरच्या इतिहासातील पहिला विकास पुरूष असे गौरोव्दार आ.संजय बनसोडे यांच्याबद्दल हेर येथील ज्येष्ठ नेते तथा उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती सोपानराव ढगे यांनी काढले.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
0 Comments