GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या पुढील कामासाठी मान्यता द्यावी

उदगीर येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या पुढील कामासाठी मान्यता द्यावी

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आमदार संजय बनसोडे यांची मागणी

उदगीर :  महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक या तीन राज्याच्या सिमेवर असलेल्या उदगीर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची जतन दुरुस्ती व्हावी म्हणून पुरात्व विभागाकडे ते सतत पाठपुरावा करुन किल्ला दुरूस्तीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करुन घेतला होता. त्याचे पहिल्या टप्प्यातील कामाची सुरुवात झाली आहे.  या भुईकोट किल्ल्याच्या बहुतांश भागाची पडझड झाली असल्याने त्या परिसराचे जतन व दुरूस्ती करण्याचे काम सद्या चालु आहे. तीन राज्याच्या सीमेवर असणाऱ्या शहरातील भुईकोट किल्याच्या पहिल्या टप्प्यातील दुरूस्तीचे काम चालु असुन उदगीर येथील ऐतिहासिक किल्ल्या ह्या स्मारकाच्या जतन व दुरूस्ती कामाच्या पुढील टप्यास मान्यता द्यावी म्हणून सद्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आमदार संजय बनसोडे यांनी लेखी  मागणी केली असुन याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  सकारात्मक प्रतिक्रिया देवून लवकरच हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

या भुईकोट किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असुन सदर किल्ला पाहण्यासाठी पर्यटक बाहेरून येथे येत आहेत. किल्ल्याच्या सर्वांगीण विकास केल्यास पर्यटक संकेत वाढ होऊन येथील स्थानिक नागरिकांना रोजगाराची निर्मिती होईल त्यामुळे या भुईकोट किल्ल्याच्या कामास आपण तात्काळ मंजुरी द्यावी अशी विनंती आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे.
या किल्ल्यापासुनच मराठा व निजामाचे युध्द झाले होते. पानिपतच्या लढाई ची खरी सुरुवात उदगीरच्या या लढाईपासुनची झाली होती. त्यामुळे या भुईकोट किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे. त्यासाठीच आपण या ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर करुन घेतला असुन त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या उदागिर बाबांच्या दर्शनासाठी परिसरासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक येथे किल्ला पाहण्यासाठी व उदागिर बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. या परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

दरवर्षी गुढी पाडव्याला येथे मोठी यात्रा भरते यावेळी लाखो नागरिकांची येथे मोठी गर्दी असते अशा या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची दुरूस्ती व्हावी म्हणून आपण विशेष प्रयत्न करुन शासनाकडुन निधी उपलब्ध करुन घेतला असुन सदर किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाचा आता वेग येईल असे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments