पंतप्रधानाचे आत्मनिर्भर व कौशल्य विकासाचे स्वप्न मातृभूमीतून साकार होत आहे : खासदार सुधाकर शृंगारे
मातृभूमीत खासदार सुधाकर शृंगारे यांचा सत्कार संपन्न
उदगीर : आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मातृभूमीतून चालू असलेल्या व्यवसायीक शिक्षणातून व कौशल्य विकासातून दिसत असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनीर्भर भारतचे स्वप्न ग्रामिण भागातून पुर्ण होत आहे असे प्रतिपादन लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले.
ते मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारासंचलित मातृभूमी महाविद्यालयात आयोजित सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सुधाकर भालेराव, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उस्तुरे, भाजपा युवा मोर्चाचे उदगीर शहराध्यक्ष मनोज पुदाले, बाळासाहेब पाटोदे, पप्पू गायकवाड , माजी नगरसेवक आनंद बुंदे भाजपा जळकोट तालुकाध्यक्ष केंद्रे ,माधव टेपाले, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार शृंगारे यांनी समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी भाजपा कटीबद्घ असुन लातूर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी केंद्रिय रस्ते विकास मंञी गडकरी यांच्या माध्यमातून ६८ कोटीचे रस्ते मंजूर झाले असुन विकासाला गती मिळणार आहे .
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नामुळे उदगीर जळकोट तालुक्यात रस्त्यासाठी मंजूर झाल्याने मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजपाचे शहराध्यक्ष सतीश उस्तुरे यांच्या वतीने खासदार सुधाकर शृंगारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मातृभूमी महाविद्यालयात कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, मातृभूमी नर्सरी स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थी तसेच भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले तर आभार प्रा.रुपाली कुलकर्णी यांनी मानले.
0 Comments