GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन आमदार संजय बनसोडे यांनी मानले आभार


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन आमदार संजय बनसोडे यांनी मानले आभार 

उदगीर : उदगीर शहराला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ उदगीर शहरहद्द ते कौळखेड मार्गे कर्नाटक बाॅर्डर जवळपास साडेचौदा कि.मी. पर्यंतच्या रस्त्यासाठी केंद्रशासनाकडुन सीआरएफ फंडातुन १८ कोटी रुपये मंजूर तर जळकोट तालुक्यातील केकतसिंदगी ते कंधार या १० कि.मी.च्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या रस्त्यासाठी १५ कोटी रुपये असे एकुण ३३ कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी 
देवून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेवुन महाराष्ट्र
राज्याचे माजी  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी सत्कार करुन आभार व्यक्त केले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना आमदार संजय बनसोडे यांनी नागपूर येथील गडकरी यांच्या निवासस्थानी भेटुन मतदार संघाला जोडणारे विविध रस्ते, उड्डाण पुल व मार्च महिन्यात आ.बनसोडे यांनी मागणी केलेल्या निवेदनानुसार उदगीर शहरातील वाहतूकीचा प्रश्न लक्षात घेवुन एन.एच.६३ आणि एन.एच. ५० शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यासाठी १४० कोटी रुपये मंजूर केले आहेत त्या कामास तात्काळ मंजुरी द्यावी त्यानंतर शिरुर ताजबंद ते उदगीर या रस्त्याच्या कामास गती देवून मतदार संघाला जोडणाऱ्या विविध कामा संबंधी संबंधित विभागास आपण तात्काळ सुचना द्याव्यात अशी विनंती आ.संजय बनसोडे यांनी यावेळी ना.गडकरी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उदगीर मतदार संघातील रस्त्यासंबंधी आ.संजय बनसोडे यांना लवकरच आपल्या मागणीचा विचार करुन त्या पूर्ण  करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments