नांदेड येथील डॉ.ऋषिकेश माहेश्वरी यांचा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने सत्कार
उदगीर : नांदेड येथील सुप्रसिद्ध मधुमेह व थायरॉईड तज्ञ डॉ.ऋषिकेश माहेश्वरी यांनी उदगीर येथील आदर्श शैक्षणिक संकुल म्हणजेच इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी क्लासेसच्या वतीने क्लासेसचे मार्गदर्शक प्रा.गुंडप्पा अमृतराव पटणे, मार्गदर्शिका सौ.नागीनबाई गुंडप्पा पटणे व संचालक प्रा.सिद्धेश्वर गुंडप्पा पटणे यांच्या हस्ते डॉ.ऋषिकेश महेश्वरी यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा.गुंडप्पा पटणे यांनी नांदेड येथील अतिशय तज्ञ व आपल्या उपचाराने मधुमेह व थायरॉईडच्या रुग्णांना नवसंजीवनी देणारे डॉ.ऋषिकेश माहेश्वरी हे उदगीर येथील परभणीकर हॉस्पिटलला दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी भेट देतात तरी या तज्ञ डॉक्टर साहेबांचा व त्यांच्या योग्य अशा उपचारांचा उदगीर येथील मधुमेह व थायरॉईडच्या रुग्णांनी लाभ घ्यावा.
0 Comments