GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

राजर्षी शाहू विद्यालयाची कु. हर्षाली राठोड जिल्ह्यात प्रथम

राजर्षी शाहू विद्यालयाची कु. हर्षाली राठोड जिल्ह्यात प्रथम

उदगीर : शहरातील राजर्षी शाहू विद्यालयाची विद्यार्थिनी कु. हर्षाली बालाजी राठोड हिने 17 वर्षे वयोगटात लातूर जिल्ह्यात आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे.
राजर्षी शाहू विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत विविध उपक्रम राबवून  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येथील सर्व शिक्षक व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यामुळेच राजर्षी शाहू विद्यालयाचे विद्यार्थी हे विविध स्पर्धेत यश संपादन करून आपल्या शाळेचे नावलौकिक वाढवत आहेत. नुकेतच कु. हर्षाली राठोड हिने बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन केल्याने शाळेचे मुख्याध्यापक कल्याणी शिवाजी व क्रीडा शिक्षक डबेडवार किशोर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments