तीन राज्याच्या सीमेवर असणाऱ्या भुईकोट किल्याचे काम दर्जेदार करा : माजी पर्यावरण मंत्री आ.संजय बनसोडे
उदगीरच्या ऐतिहासिक किल्लाचे महत्व लक्षात घेवुन काम वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश
उदगीर : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक या
तीन राज्याच्या सिमेवर असलेल्या उदगीर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची जतन दुरुस्ती व्हावी म्हणून मी स्वतः माजी सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन किल्ला दुरूस्तीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करुन घेतला होता. त्याचे पहिल्या टप्प्यातील कामाची सुरुवात झाली आहे. या भुईकोट किल्ल्याच्या बहुतांश भागाची पडझड झाली असल्याने त्या परिसराचे जतन व दुरूस्ती करण्याचे काम सद्या चालु आहे. तीन राज्याच्या सीमेवर असणाऱ्या शहरातील भुईकोट किल्याच्या पहिल्या टप्प्यातील दुरूस्तीचे काम दर्जेदार व वेळेत पुर्ण करा अशा सुचना माजी पर्यावरण मंत्री तथा उदगीरचे आ.संजय बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
ते उदगीर शहरातील शासकीय नविन विश्रामगृह येथे आयोजीत किल्ला संदर्भातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, जतन सहाय्यक नितीन चारोडे, ज्युनिअर इंजिनिअर अन्सारी,वास्तु विशारद तेजस्विनी आफे, गिरी महाराज आदीसह संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी,
या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असुन येथेच मराठा व निजामाचे युध्द झाले होते.
पानिपतच्या लढाई ची खरी सुरुवात उदगीरच्या या लढाईपासुनची झाली होती. त्यामुळे या भुईकोट किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे. त्यासाठीच आपण या ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर करुन घेतला असुन त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील कामासाठी जवळपास ४ कोटी रुपये मंजूर करून घेतले यासाठी माजी मंत्री अमित देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचेही आ.बनसोडे यांनी आवर्जुन सांगितले. किल्ल्यामध्ये असलेल्या उदागिर बाबांच्या दर्शनासाठी परिसरासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक येथे किल्ला पाहण्यासाठी व उदागिर बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी गुढी पाडव्याला येथे मोठी यात्रा भरते यावेळी लाखो नागरिकांची येथे मोठी गर्दी असते अशा या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची दुरूस्ती व्हावी म्हणून आपण विशेष प्रयत्न करुन शासनाकडुन निधी उपलब्ध करुन घेतला असुन सदर किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाचा कालावधी हा जवळपास 18 महिन्याचा आहे. या वेळेतच सदर काम पूर्ण करावे अशा सूचनाही यावेळी आ.बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देताना किल्ला परिसरात ज्या भागात काम करायचे आहे तेथील झाडे झुडपे काढण्यात आले असुन या भागाचा ड्रोन ने सर्वे केला आहे. त्याचे मॅपिंग सुद्धा काढले आहे. या परिसरातुन उदागिर बाबांच्या मंदिराकडे जाणा-या भागातील बुरुजाचा भाग पावसाचे वेळी ढसाळला होता त्याची व्यवस्थित पाहणी करून त्याचे दुरुस्तीचे काम काम चालू असल्याचे सांगितले. या आढावा बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments