महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या तालुकाध्यक्षपदी नंदकुमार माने तर सचिवपदी आण्णाराव कांबळे यांची निवड
उदगीर : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या एनजीपी ४५११ शाखा उदगीरच्या तालुकाध्यक्षपदी नंदकुमार माने तर सचिवपदी आण्णाराव कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करुन उर्वरीत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्षपदी प्रकाश कुलकर्णी तर मार्गदर्शक म्हणून शिवराज ब्राम्हण्णा यांचीही निवड करण्यात आली आहे.
यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष दयानंद एरंडे, लातूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ नरवडे, जिल्हा सदस्य माधव आलमले, अमोल गायकवाड व उदगीर तालुक्यातील ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मराठवाडा वि.अ. दयानंद सरंडे यांच्या व नवनाथ नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कार्यकारिणी करण्यात आली. सदर निवडीबद्दल नुतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
0 Comments