GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी लढणारे नेते आ.संजय बनसोडे : सरपंच चंद्रशेखर पाटीलजळकोट :

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी लढणारे नेते आ.संजय बनसोडे : सरपंच चंद्रशेखर पाटील


जळकोट : बळीराजाचे हित जोपासणारा जाणता राजा म्हणून विकासाची दृष्टी असलेले आणि उदगीर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट घडवून आणणारे विकास महर्षी माजी राज्यमंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आ. संजय बनसोडे यांची ओळख निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न तडीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून, विकासासाठी राजकीय पक्षाचे विचार बाजूला ठेवून विकास करण्यासाठी मंत्री, नेते यांना भेटून आपल्या विधानसभा मतदारसंघात विकास निधी खेचून आणण्याची कला त्यांना अवगत आहे. त्यामुळेच उदगीर विधानसभा मतदारसंघाचा गेल्या कित्येक वर्षाचा विकासाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे असून असा आमदार भाग्याने मिळतो 
असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा अतनुरचे सरपंच चंद्रशेखर पाटील आतनुरकर यांनी व्यक्त केले .

जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय मंजुरीसाठी गेल्या कित्येक वर्षापासूनचे प्रयत्न आ. संजय बनसोडे यांनी मार्गी लागले आहेत. वीज वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय जळकोट येथे मंजूर करून घेतल्याबद्दल जळकोट तालुक्यातील आतनूर येथील शेतकऱ्यांनी आ. संजय बनसोडे यांचा हृदय सत्कार करून ऋणनिर्देश व्यक्त केले . या सत्कार सोहळ्यासाठी आतनूरचे युवा सरपंच चंद्रशेखर अशोकराव पाटील आतनूरकर, उपसरपंच बाबुराव कापसे, माजी सैनिक इस्माईल साब मुंजेवार, माजी सरपंच दिलीपराव कोकणे, आयुब साब मुंजेवार, महात्मा गांधी ग्राम तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विकासराव सोमुसे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बारसुळे, गणेश गायकवाड इत्यादी मान्यवर या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना आ. संजय बनसोडे यांनी , मला शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी, व्यापारी बंधूंनी आणि उदगीर विधानसभा मतदारसंघातील सुजाण बंधू भगिनींनी जे प्रेम दिले आहे. जे बहुमत दिले आहे. त्या बहुमताच्या बळावर मला मंत्रिपद मिळाले, ते मंत्रिपद या जनतेच्या सेवेसाठीच होते आणि आज आमदार आहे ते देखील जनतेची सेवा करण्यासाठीच! हा मूळमंत्र आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दिला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे आणि मी ते शेवटपर्यंत जपणार असुन मी सदैव जनतेच्या सेवेकरीता काम करणार असल्याचे आ.बनसोडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments