जिग्नेश मेवाणी यांनी गड राखला : माजी नगरसेवक निवृत्ती सांगवे
उदगीर मध्ये जल्लोष,फटाक्यांची आतिषबाजी!
उदगीर : राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे गुजरात विधानसभेचे उमेदवार आमदार जिग्नेश मेवाणी यांनी संपूर्ण गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाची लाट असताना देखील राष्ट्रीय दलित अधिकार मंचची प्रतिष्ठा सांभाळून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हे त्यांच्या लोकप्रियतेचे आणि दांडग्या जनसंपर्काचेच उदाहरण असल्याचे मत राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक निवृत्तीराव सांगवे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील डॉक्टर झाकीर हुसेन चौकात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे संस्थापक अध्यक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या विजयाबद्दल उदगीर शहरात चौका चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवाची सांगता डॉ.जाकिर हुसेन चौक येथे करण्यात आली. प्रत्येक चौकात फटाके वाजवून, पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता माने, बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय कुमार, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे रवी जवळे, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रसिद्धी प्रमुख बंटी घोरपडे, शेख सोहेल, याकुब शेख, गौस शेख, इलियास शेख, पियू माने, संजय राठोड यांच्यासह राष्ट्रीय दलित अधिकार मंच, एम आय एम आणि बहुजन विकास अभियानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन विकास अभियानचे प्रमुख संजय कुमार यांनी केले. सूत्रसंचालन बंटी घोरपडे यांनी तर आभार रवी जवळे यांनी मानले.यावेळी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments