GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

पाच वर्षात उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले: माजी नगराध्यक्ष बागबंदे

पाच वर्षात उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले: माजी नगराध्यक्ष बागबंदे

होळी चौकात रस्त्याच्या कामाचा बागबंदे यांच्या हस्ते शुभारंभ


उदगीर : मागच्या नगर परिषदेच्या निवडणूकीत शहरातील मतदारांनी भारतीय जनता पक्षाला निवडून दिले. गेली पाच वर्षे आपण नगराध्यक्ष म्हणून काम करीत असताना सर्व नगरसेवकांच्या सहकार्यातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले असल्याचे मत माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांनी व्यक्त केले.
उदगीर शहरातील होळी चौक ते चौबारा रोड रस्त्याच्या कामाचा माजी नगराध्यक्ष बागबंदे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, माजी नगरसेवक रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, रामेश्वर पवार, गणेश गायकवाड, पप्पू गायकवाड, रुपेंद्र चव्हाण, आनंद बुंदे, मुरलीधर जोशी महाराज, धोंडिबा मोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बस्वराज बागबंदे म्हणाले की, पाच वर्षांच्या काळात मतदारांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. विकासाची कामे करीत असताना उदगीरकरांची मान खाली जाईल असे काम केले नाही. उदगीर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करीत असताना नगर परिषदेच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी नवीन दोन महत्वपूर्ण अशा शॉपिंग कॉम्प्लेक्स ची उभारणी केली शहरात अनेक बेघर व्यक्ती फिरत होत्या, अशा नागरिकांसाठी बेघर निवारा केंद्र उभे करून त्यांची सोय केली. अशा अनेक विकासाच्या योजना राबवित असतानाच उदगीरकरांच्या अस्मितेचा असलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाणी पुरवठा सभापती मनोज पुदाले यांच्या पुढाकाराने प्रयत्न केला. आज शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे काम आपल्या कार्यकाळात पूर्ण केले असे सांगून माजी नगराध्यक्ष बागबंदे यांनी आगामी काळातही भाजपच्या पाठीशी आपली शक्ती उभी करावी असे आवाहन केले.
यावेळी ब्राह्मण गल्लीतील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments