उदगीर युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी धिरज कसबे यांची निवड
उदगीर : काँग्रेस पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त युवकांना काम करण्याची संधी देण्यात असुन, भविष्यात काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी समाजातील कार्यक्षम युवा कार्यकत्यांना वेगवेगळ्या पदावर नियुक्ती देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युवकांना संधी देवून त्यांना जनसेवेसाठी तयार केले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे
उदगीर येथील धीरज उर्फ बंटी पांडुरग कसबे यांची नुकतीच उदगीर विधानसभा युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना सदर निवडीचे पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले .
यावेळी बोलताना नुतन शहराध्यक्ष धीरज कसबे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख, प्रदेश काँग्रेसचे नेते राजेश्वर निटूरे, युवक प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, युवकचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल धीरज कसबे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
0 Comments