कानेगावची स्वरूपा लांडगे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण
लातुर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगावच्या जिल्हा परिषद शाळेची कु. स्वरूपा अप्पाराव लांडगे ही विद्यार्थीनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जुलै महिन्यात घेतली होती. त्याचा निकाल नुकताच त्यात आहे. त्यात कानेगावची स्वरूपा लांडगे ही विद्यार्थीनी उत्तीर्ण झाली आहे.विशेष म्हणजे तिचे वडील मागील कोरोना महामारीचा बळी ठरले होते. यामुळे शाळेतील राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीलकुमार पांचाळ गुरुजींनी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले होते.आकस्मित आलेल्या दुःखावर मात करीत तिने यशाला गवसणी घातली आहे.त्याबद्दल तिचा पालकांसह शाळेच्या व ग्रामपंचायततर्फे शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच ब्रम्हानंद शिवणगे,उपसरपंच राम आटार्गे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर लांडगे, माजी सरपंच तुकाराम लांडगे,मुख्याध्यापक सुरेश बिरादार,व्यंकट जळकोटे, गंगाधर बोरूळकर,चंद्रसेन ढगे यांची उपस्थिती होती.स्वरूपाला राधाबाई येडले, सुशीलकुमार पांचाळ,प्रशांत जाधव, शरद येडले यांचे मार्गदर्शन लाभले.मागील चार वर्षापासून सतत स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्याने यश मिळत असल्याबद्दल कानेगावच्या शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दबदबा तालुक्यामध्ये निर्माण केला आहे. शाळेच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, शिक्षणविस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख शिवाजीं एरंडे, विठ्ठल वाघमारे, विषय साधनव्यक्ती सुनील गायकवाड,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर सोलंकर,उपाध्यक्ष अमोल यांचे,सदस्य गणेश सुरवसे, लक्ष्मण अटारगे आदींनी मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments