GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

भाजपा प्रदेश महिला आघाडीच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान

भाजपा प्रदेश महिला आघाडीच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान
उदगीर : भाजपाच्या महिला मोर्चा आघाडीच्या महिला प्रदेश चिटणीस मीनाक्षी पाटील शिरोळकर यांच्या वतीने विविध क्षेत्रातील नवदुर्गांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षा आ. उमाताई खापरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधाकर भालेराव होते तर व्यासपीठावर जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले,शहराध्यक्ष मनोज पुदाले, महानंदा बहेनजी, कल्पना डांगे,उत्तराताई कलबुर्गे,सरोजा वारकरे, रेखाताई हक्के,श्यामला कारामुंगे,वंदना गरड , मंदाकिनी जीवने, बबीता पांढरे यांची उपस्थिती होती.
यावेळी आ. उमाताई खापरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मृदुला पाटील,आरती गवारे,डॉ.सोनल चामे, पार्वती गवारे,सुलोचना म्हेत्रे,सविता चौधरी, सरिता द्वासे,पार्वती चौधरी,श्रीमती घटकार या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळावर व रेल्वे बोर्डावर अशासकीय सदस्य असताना प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बचत गटाच्या महिलांना उद्योग करण्यासाठी स्टॉल दुकान मंजूर करून घेतल्याबद्दल महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस मीनाक्षी पाटील यांचा आ. खापरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विराज पाटील,संदीप पाटील,आनंद भोसले,रामकिशन मांजरे,निवृत्ती जवळे,आर. एम. लाडके यांनी पुढाकार घेतला होता.

Post a Comment

0 Comments