उदयगिरी अॅकॅडमीमध्ये गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा
उदगीर : उदगिरी अॅकॅडमीमध्ये गूणवंत विद्यार्थ्याचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे हा पारितोषिक वितरण सोहळा अॅकॅडमीच्या पहिल्या बॅचची गुणवंत विद्यार्थीनी डाॅ. कु. रूतूजा शिवराज अंबूलगे हिच्या शूभहस्ते झाला.
ज्या विद्यार्थींनीने इयत्ता ७ वी ते दहावी पर्यंत उदयगिरी अॅकॅडमीत शिक्षण घेवुन विविध बक्षीसे मिळविले शेवटी सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. पूर्ण केले. यामुळे अशा विद्यार्थींनीच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
हे या कार्यक्रमाचे विशेष! यावेळी रूतूजा अंबूलगे हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आणि अॅकॅडमीच्या गौरवशाली इतिहासाची मी साक्षीदार असल्याची कबूली अत्यंत अभिमानाने दिली.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रस्तावीक अॅकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी केले. यावेळी अॅकडमीचे सहसंचालक प्रा. संतोष पाटील व डाॅ. धनंजय पाटील आणि प्रा. श्रीगण रेड्डी उपस्थीत होते.
0 Comments