GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

ज्ञानेश्वर जवळे यांना नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान

ज्ञानेश्वर जवळे यांना नेशन बिल्डर अवॉर्ड  प्रदान


अहमदपूर : तालुक्यातील कुमठा (बु )
सरस्वती मा. व उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठीचे विद्यार्थी प्रिय, शिस्तप्रिय, मराठी विषयाचे गाढे अभ्यासक  जवळे ज्ञानेश्वर रामराव यांना त्यांच्या शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब अहमदपूर तर्फे उत्कृष्ट शिक्षक म्हणून नेशन बिल्डर अवॉर्डने मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, बुके देऊन ज्ञानेश्वर जवळे व त्यांच्या पत्नी सत्यशिला जवळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी गट शिक्षण अधिकारी  बबनराव ढोकाडे, रोटरीचे अध्यक्ष  जीवन कापसे,सचिव कपिल बिरादार हे उपस्थित होते. ज्ञानेश्वर जवळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव  डी. बी. लोहारे, शाळेचे प्राचार्य   जी. आर शिंदे ,प्रा.बी.एस पटवारी, एम.बी वाघमारे , ए.पी राठोड, व्ही .जी पुठठेवाड  यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments