GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

आठ महसूल मंडळात २०४ राशनकार्ड व ३६ प्रमाणपत्रचे वाटप

आठ महसूल मंडळात २०४ राशनकार्ड व ३६ प्रमाणपत्रचे वाटप

आ.संजय बनसोडे यांच्या सुचनेचे पालन


उदगीर : तालुक्‍यातील आठ महसुल मंडळामध्‍ये राष्‍ट्रनेता ते  राष्‍ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत २०४ शिधापत्रीका व ३६  प्रमाणपत्रांचे वाटप उदगीरचे आमदार तथा माजी गृह राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या सूचनेनुसार काल करण्यात आले.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. , उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीणजी मेंगशेट्टी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर तालुक्‍यातील एकुण आठ महसुल मंडळामध्‍ये 'महाराजस्व' अभियाना अंतर्गत राष्‍ट्रनेता ते  राष्‍ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
दि. २८ सप्‍टेंबर २०२२ रोजी तहसील कार्यालय उदगीर येथे तहसीलदार रामेश्वर गोरे व महसुलचे नायब तहसीलदार 
प्रकाश धुमाळ  यांचे हस्‍ते नागलगाव मंडळातील तोंडचीर मधील २१ लाभार्थ्‍यांना शिधापत्रीका वाटप करण्‍यात आले तर १० उत्‍पन्‍न प्रमाणपत्र , १० रहिवासी प्रमाणपत्राचे ही वाटप करण्‍यात आले.
त्यानंतर उदगीर मंडळातील बनशेळकी येथे 
नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर  महसुल यांचे हस्‍ते एकुण १५ शिधापत्रीका व वय अधिवास चे २ प्रमाणपत्रांचे वाटप करण्‍यात आले .
तोंडार मंडळातील डोंगरशेळकी येथे नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांचे हस्‍ते १३ शिधापत्रीकाचे वाटप करण्‍यात आले.
वाढवणा मंडळातील सुकणी येथे पुरवठ्याचे 
नायब तहसीलदार शिवशंकर बेंबळगे यांचे हस्‍ते एकुण १५  शिधापत्रीका तसेच ३ उत्‍पन्‍नाचे प्रमाणपत्र व एक नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले.
दि. २९ सप्‍टेंबर २०२२ रोजी मोघा मंडळातील तोगरी येथे संगायो 
नायब तहसीलदार प्रकाश कोठुळे यांचे हस्‍ते एकुण ५०  शिधापत्रीका वाटप करण्‍यात आल्या . हेर मंडळातील लोहारा येथे पंडीत जाधव मंडळ अधिकारी यांचे हस्‍ते ४० शिधापत्रीकाचे तर देवर्जन मंडळातील देवर्जन येथे नायब तहसीलदार संतोष गुट्टे
संतोष गुट्टे यांचे हस्‍ते एकुण ३६ शिधापत्रीका तर नळगीर मंडळातील अवलकोंडा येथे पुरवठ्याचे नायब तहसीलदार शिवशंकर बेंबळगे यांचे हस्‍ते एकुण १४  शिधापत्रीका तसेच दहा  ७/१२  चे  वाटप करण्‍यात आले. उदगीर तालुक्‍यातील विविध आठ मंडळामध्ये सेवा पंधरवाडा कार्यक्रमा अंतर्गत एकुण २०४ शिधापत्रीका  व महसुल विभागाअंतर्गत देण्‍यात येणा-या विविध ३६ प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले.
या कार्यक्रमास संबंधीत गावाचे तलाठी व मंडळ अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments