GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी


अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

    उदगीर : तालुक्यातील मोघा महसूल मंडळातील अतिवृष्टीच्या यादीतून सर्वच गावे वगळल्याने या भागातील सरपंच व शेतकऱ्यातून शासनाचे विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांना व तहसीलदार रामेश्वर गोरे यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मागील काळात उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र शासनाने उदगीर जळकोट हे दोन तालुके सोडून इतर तालुक्यात शासनाने शेतकऱ्यांना मदत केली मात्र या भागात कसल्याही प्रकारची मदत आली नसल्याने या भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार, माजी सरपंच ज्ञानेश्वर बिरादार, शिवराज बिर्गे, पवन बिरादार, सिद्राम बेलकुंडे, माधवराव पाटील, मलिकार्जुन काळजापुरे, सय्यद कलीम, राजकुमार बिरादार, सोमेश्वर पटवारी यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments