GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मराठी पञकार परिषदेच्या तालुका जोडो आभियानाचा उदगीरात शुभारंभ

मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका जोडो आभियानाचा उदगीरात शुभारंभ

उदगीर : मराठी पत्रकार परिषद ,मुंबई  या पञकारांच्या मातृसंस्था असुन पञकाराच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी  पत्रकारांना थेट परिषदेला संपर्क करण्यासाठी राज्यभरातील तालुके परिषदेशी जोडले जाणार आहेत. यासाठी " तालुका  जोडो आभियान " राबविले जात आहे. या आभियानाचा शुभारंभ रविवारी ( दि.७  )छञपती शाहु महाराज सैनिकी विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आला.
यावेळी मराठी पञकार परिषदेचे  कोषाध्यक्ष विजय जोशी , राज्य प्रसिद्धी प्रमुख व तालूका संपर्क अभियानाचे प्रमूख  अनिल महाजन , राज्य कार्यकारणी सदस्य अनिल वाघमारे ,आभियान समितिचे सचिन शिवशेट्टे , श्री.क्षिरसागर यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थीती होती.
यावेळी मराठी पञकार परिषद गेल्या पंच्याएशी वर्षापासुन पञकाराचा लढा लढत आहे. छोट्या मोठ्या वृतपञाच्या अडचणी असतील पञकारांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना आर्थिक निधी उभा करुण  प्रत्यक्ष मदत करण्यासाठी धावुन जाते. परिषदेचे नेते एस.एम देशमुख यांनी  पञकारावर होणारे हल्ले रोखण्यासाठी पञकार संरक्षण कायदा करण्यास राज्यशासनाला भाग पाडले. असा कायदा करणारे देशातील पहिले राज्य आहे.आजही ग्रामिण भागातील पञकाराचे प्रश्न  आहेत. ते सोडवण्यासाठी  तालुक्यातील पञकारांनी पञकार परिषदेशी जोडले जावे असे अवाहन अनिल महाजन यांनी केले. यावेळी कोषाध्यक्ष विजय जोशी  कार्यकारणी सदस्य अनिल वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पञकराशी मुक्तपणे चर्चा करण्यात आली.
 यावेळी पञकार  श्रीनिवास सोनी , सुनिल हवा , बिभीषन मद्देवाड ,सिद्धार्थ सुर्यवंशी ,व्हि.एस.कुलकर्णी , बबन कांबळे , इरफान शेख ,प्रभुदास गायकवाड , विक्रम हलकीकर ,अंबादास अलमखाने , सुनिल मादळे ,निवृती जवळे ,संदिप निडवदे , अरविंद पत्की ,सुधाकर नाईक ,माधव अनवले ,नागनाथ गुट्टे , माधव रोडगे , कृष्णा चव्हाण इत्यादी पञकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments