उदगीर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी व मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी चंदन बसवराज पाटील नागराळकर यांची निवड झाल्याबद्दल उदगीर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी शहरातील डॉ. जाकिर हुसैन चौकात मोठा हार, फटाके, बँड पथकासह फेटा बांधून चंदन पाटील यांचे जंगी स्वागत येथील पदाधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर शहरातील मुख्य रस्ताने रॅली काढण्यात आली. यावेळी शेकडो तरुण उपस्थित होते.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी मुळे, शहराध्यक्ष समीर शेख कार्याध्यक्ष तथा माजी न.प. सभापती गजानन सताळकर, माजी पाणीपुरवठा सभापती अनिल मुदाळे, सय्यद जानी, शफी हाश्मी, शिवकुमार कांबळे, श्रीकांत पाटील, जवाहरलाल कांबळे, दावण गावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, धनाजी बनसोडे, फिरोज देशमुख, इम्रोज हाश्मी, शमशुद्दीन जरगर, अजय शेटकर, पाशा बेग, समद शेख, बंटी अलमकेरे,अभिजीत औटे,बबलू मुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस डॉक्टर सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चंदन पाटील नागराळकर यांनी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विरोधी पक्षनेते अजित पवार , संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे, माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे , लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील, देशाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांचे व उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.
0 Comments