उदगीर शहरातील महात्मा गांधी गार्डनचे सुशोभीकरण करुन महात्मा गांधीजींचा पुतळा उभारणार - पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीर : उदगीर शहरातील सर्वात जुने असलेले आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले महात्मा गांधी गार्डनचे सुशोभीकरण करण्यात येणार असून या कामाचा भुमीपुजन सोहळा काल पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी मुळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष मंजूर खांन पठाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष
गजानन सताळकर, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, नगरपालिका मुख्याधिकारी शुभम क्यातमवर, तहसिलदार रामेश्वर गोरे, अनिल मुदाळे, ताहेर हुसेन, हाशमी ईमरोज, ईब्राहीम पटेल, आशिष हंगरगे इत्यादी उपस्थित होते.
उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागात नांदेड रोड लगत महात्मा गांधी गार्डन असुन सदरील गार्डन हे उदगीर शहरातील पहिले गार्डन आहे. सदरील गार्डनचे सुशोभीकरण करण्यात येणार असुन यामुळे उदगीर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. लहान मुले व वृध्दांना त्याचा लाभ होणार आहे. यासाठी उदगीर नगर परिषदेने महात्मा गांधी गार्डनचे सुशोभीकरण करण्याचे काम वैशिष्टयपुर्ण योजनेतून २५ लाख रु. निधीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच महात्मा गांधी गार्डनचे सुशोभीकरण करण्याबरोबरच महात्मा गांधीजींचा पुतळा बसविण्यात येणार असुन सदरील सुशोभीकरणाचे काम पुढील ६० दिवसांत पुर्ण करण्याचे तसेच हे काम दर्जेदार आणि वेळेत करण्याच्या सुचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.
0 Comments