GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर शहरातील वाहतुक सिग्नलचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण

उदगीर शहरातील वाहतुक सिग्नलचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण



उदगीर : उदगीर शहरातील वाहतुक सिग्नलचे काल राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पन करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर,         कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष 
शिवाजीराव मुळे, उपविभागीय अधिकारी
प्रवीण मेंगशेट्टी, नगरपालिका मुख्याधिकारी शुभम क्यातमवर, अभियंता उदय इप्पिली, भरत चामले, मंजूर खांन पठाण, समीर शेख,
ज्ञानेश्वर पाटील इत्यादी उपस्थित होते.
उदगीर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी उदगीर नगर परिषदे अंतर्गत सौर ऊर्जेवरील ट्रॅफिक सिग्नल बसविण्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय या योजनेतून सिग्नल बसविण्यात आले आहेत. कॅप्टन चौक, शिवाजी चौक, पोलिस स्टेशन चौक व डॉ.झाकीर हुसैन चौक या ठिकाणी सिग्नल उभारण्यात आले आहेत. सदर सिग्नलचे उदघाटन छ.शिवाजी महाराज चौक येथे उदगीर मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
उदगीर शहरात विकास कामाचा वेग सुरू असुन शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या त्या अनुषंगाने निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शहरातील नागरीकांची बऱ्याच दिवसापासुन सिग्नल बसवावे ही मागणी होती. नगर परिषद उदगीर तर्फे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) या योजने अंतर्गत ५० लाख निधीतून सौर ऊर्जेतून ट्रॅफिक नगर परिषदेचे अंदाजे वीस हजार रुपयाची वीज बिलाची बचत होणार आहे व शहरातील रहदारीच्या ठिकाणी वाहतुकीत अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. यामुळे उदगीर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेला वाहतुकीचा प्रश्न मार्गी निघाला आहे.

Post a Comment

0 Comments