उदगीर - कृषी महाविद्याल,डोंगरशेळकी तांडा येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम वर्ष २०२२-२०२३, मौजे लोणी येथे विविध उपक्रमाच्या माध्यातून मोठ्या उत्साहात चालू आहे.
हा ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम डॉ. ङी.एन. गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता(कृषि), व.न.म.कृ., परभणी, डॉ. आर.पी. कदम, विस्तार शिक्षण विभाग, व.न.म.कृ., परभणी आणी कृषि महाविद्यालय लातूरचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. बी.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध मराठवाड्यामध्ये विविध कृषि महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
या माध्यमातून उदगीर तालुक्यातील लोणी गावात पी.आर.ए. उपक्रमाचे आयोजन केले. यामध्ये रांगोळी च्या माध्यमातून गावातील अडचणी, नैसर्गिक स्त्रोत, शेतीखालील क्षेत्र, गावातील आर्थिक स्थिती, सामाजिक व्यवस्था, कृषी व्यवस्था आणी शैक्षणिक व्यवस्था इत्यादी विषयक माहिती विविध आकृतीच्या माध्यमातून गावातील नागरिकांना सविस्तर सांगितली.
हा उपक्रम भावना साबने, आलगुङे, बलवंत, कलवाळे, इत्यादी कृषिकन्यांनी आयोजीत केला.या उपक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ ए. एम. पाटील, कार्यक्रम समन्वय ङाॅ. एस.एन. वानोळे आणी कार्यक्रम अधिकारी प्रा. शितल पाटील यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी गावातील शेतकरी, महीला, प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
0 Comments