GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

उदगीर शहरालगतच्या रिंग रोड साठी 140 कोटीचा निधी मंजूर ; गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नास यश

उदगीर शहरालगतच्या रिंग रोड साठी 140 कोटीचा निधी मंजूर ; गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नास यश

 उदगीर शहरातचा सर्वांगीण विकासाचा रथ अविरतपणे सुरू

मा.ना.केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांचे मानले अभार


 उदगीर : मागील  दोन अडीच वर्षापासून उदगीर शहराच्या सर्वांगीण विकासाचा रथ अविरतपणे सुरू आहे उदगीरच्या  विकासासाठी राज्य शासनाने भरीव अशी निधी मंजूर केला आहे. सर्वांगीण विकासात सोबतच पायाभूत विकासाला प्रामुख्याने प्राधान्य देण्यात  आले  त्यात रस्ते, नाले ,पाणी पुरवठा योजना, प्रशासकीय इमारत , उद्याने,विविध जाती समुहाचे धार्मिक सभागृह, शहरातील महापुरुषांचे पुतळे, यांचा समावेश आहेत यासोबतच  उदगीर शहराला जोडणाऱ्या व शहरातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय व राज्य मार्ग  यांची दुरुस्ती व नवीन रस्ते उभारण्यात आले आहेत.
 याच अनुषंगाने या विकासाचे  पुढील पाऊल म्हणजे या भागातील व्यापारी तसेच नागरिकांची अनेक वर्षापासूनची उदगीर रिंग रोडची असलेली मागणी होय यालाही आज मंजुरी मिळाली असुन यासाठी शासनाने 140 कोटी निधी उपलब्ध करून दिला.
 राज्याचे गृहराज्यमंत्री तथा उदगीर चे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांनी पाठपुरावा करून उदगीर लगतचा रिंग रोड मंजूर करून घेतला आहे शहरातचा होणारा विकास आणि वाटली लोकसंख्येचा विचार करतात अशा अत्यंत आवश्यकता होती हा रिंग रोड शहरालगतच्या मलकापूर फाटा इच्छापूर्ती हनुमान मंदिर  ते पिंपरी तलाव, सौनिकी शाळा, अवलकोंडा हद्दीतील बोरताळा फाटा येथून करण्यात येणार असून या ची लांबी जवळपास 13 किलोमीटर असणार आहे शहराजवळून जाणाऱ्या रिंग रोड मुळे शहरात होणारी अनावश्यक अशी वाहतूक रिंग रोड मार्गे शहराबाहेर जाण्यास मदत होणार आहे.
उदगीर शहर हे तीन राज्याच्या सीमेवर असून व्यापारी दृष्टीने हे शहर मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाचे शहर असून या रिंग रोड मुळे फायदा होणार आहे.
 उदगीरच्या विकासात व सौंदर्यात या रिंग रोड मुळे भर पडणार असून यासोबतच उदगीर चा भौगोलिक रचनेत ही या अनुषंगाने महत्त्वाचे बदल होण्यास मदत होईल या रिंग रोड साठी केंद्र शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून व सतत पाठपुरावा करून यासाठी निधीची मंजुरी मिळवली आहे केंद्र सरकारच्या वाहतूक व रस्ते विकास मंत्री मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे यामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री व उदगीर चे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत.
 उदगीर शहराचा सर्वांगीण विकास होत आहे यापुढीलही काळात ही असाच विकास  सुरू राहील या भागाच्या विकासासाठी पुढील काळात कोणती समस्या येणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही यावेळी नामदार संजय बनसोडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments