डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून समता सैनिक दलाचा ९५ वा वर्धापनदिन साजरा
उदगीर : डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर समता सैनिक दलाचा ९५ वा वर्धापनदिन साजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्यासाठी सत्याग्रह करून चवदार तळे सर्व जातीधर्माच्या लोकांना खुले करून देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली.त्यानिमित्त २० मार्च रोजी समता सैनिक दलाचा ९५ वा वार्धपन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बहुजन विकास अभियानाचे अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे, बौद्ध महासभेचे अध्यक्ष एस.डी.कांबळे, सचिव मनोहर कांबळे, देविदास कांबळे, दयानंद शिंदे, जितेंद्र शिंदे, छावाचे दत्ता पाटील, विठ्ठल कोल्हे, निवृत्ती भाटकुळे, सिद्धार्थ शिंदे, राजकीरण शिंदे, प्रितम सूर्यवंशी, संजय राठोड सोमनाथपूर, मानसिंग पवार, अझरोद्दीन शेख, सुधाकर नाईक, नागनाथ ससाणे,परमेश्वर अडगुलवार,अमोल कांबळे आदी उपस्थित होते.
0 Comments