ब्रेकिंग न्यूज

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

लोणी येथे संत रविदास महाराज जयंती साजरी

लोणी येथे संत रविदास महाराज जयंती साजरी

उदगीर - तालुक्यातील लोणी ग्रामपंचायत कार्यालयात संत रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
             महान संत रविदास यांचा जन्म सुमारे इ.स. १४५० मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतां मध्ये अग्रणी होते. ते कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरुग्रंथ साहेब मध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. आशा या महान संतांची जयंती लोणी ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम लोणी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. उषा यमुनाजी भुजबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी संत रविदास महाराज यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती उपस्थितांना देण्यात आली. 
                  यावेळी ग्रामपंचायत सदस्य दयानंद पटवारी, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी मुळे, अंकुश केंद्रे, रोहिदास मदनुरे, सुभाष कावर,यमुनाजी भुजबळे, विश्वनाथ कांबळे, अशोक मदनुरे, उध्दव केंद्रे,माधव सोलापुरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post