GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार अनंत पारसेवार यांना जीवन गौरव तर न्यूज १८ लोकमतचे सिध्दार्थ गोदाम यांना विशेष पुरस्कार जाहीर

शोध वार्ता गटात-  अरुणकुमार म्हेञे 
तर  उत्कृष्ठ गटात -  विनोद चव्हाण प्रथम

उदगीर : येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पत्रकार संघ { रजि} च्या
वतीने अयोजित राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर केले असून जेष्ठ पत्रकार  अनंत पारसेवार  यांनी वृत्तपत्र क्षेत्रात  केलेल्या कार्याबद्दल त्यांना 'जीवन गौरव' पुरस्कार तर 
न्यूज़ 18 लोकमत औरंगाबादचे ब्यूरो चीफ ,
सिद्धार्थ गोदाम यांचा सन्मान होणार असुन असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड व सचिव सिध्दार्थ सुर्यवंशी यांनी जाहीर केले.

रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने मागील सहा वर्षापासुन  देश स्तरावरील लघुपट महोत्सव व   साहित्य ,कला शैक्षणिक ,सामाजिक,  पर्यावरण विषयक ,आरोग्य ,  क्षेत्रात उत्कृष्ठ कार्यकरणार्‍या व्यक्ती व संस्थाना   राज्यस्तरीय  पुरस्काराने गौरविले जाते . तसेच राज्यस्तरीय पञकारीता पुरस्कारात  शोध वार्ता व उत्कष्ठ वार्ता या दोन गटातून  राज्यस्तरीय  पुरस्काराचे आयोजन केले जाते .२०२१ या वर्षातील जाहीर झालेल्या पुरस्कारात दैनिक लोकमतचे  नवी मुंबई  येथील प्रतिनिधी अरुणकुमार म्हेञे  यांच्या ' ते नाजूक हात भिक मागू लागतात तेव्हा ' या बातमीस  माधव लांडगे यांच्या  स्मरनार्थ अॅड  विष्णू लांडगे यांच्या वतीने ३ हजार रु रोख,  गौरव चिन्ह गौरवपञ चिन्ह व  ,व्दितीय पुरस्कार दैनिक  तरुण भारतचे  उदगीर जि.लातूर येथील प्रतिनीधी  नागेंद्र साबने  यांच्या ' उद्योगासोबत समाजाच्या आरोग्याचे भान राखनारा गोल्डन हेरीटेज आॅर्गेनिक्स "' या बातमीस   के राजकुमार मुनाळे यांच्या स्मरनार्थ  पञकार  मनोहर लोहारे यांच्या वतीने  दोन हजार रुपये रोख,  गौरव चिन्ह व गौरवपञ
*तृतिय पुरस्कार* 
  तेर जिल्हा उस्मानाबाद येथील दैनिक   दिव्य मराठिचे प्रतिनिधी  सुभाष कुलकर्णी यांच्या " बौद्घस्तुपाला लोकसहभागाचा आधार" या बातमीस  प्रल्हाद येवरीकर  यांच्यावतीने यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपये, गौरवचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
सर्वोत्कष्ठ वार्ता गटात

*प्रथम पुरस्कार*
दैनिक लोकमत टाईम्स व पीटीआय चे   लातूर   येथील प्रतिनिधी  विनोद चव्हाण  यांच्या "   लाॅकडाऊन ईज बेस्ट टाईम फाॅर किड्स टू लर्न न्यू स्किल  ' या बातमीस   संदीप मद्दे यांच्या   यांच्या वतीने ३ हजार रु रोख,  गौरव चिन्ह गौरवपञ ,व्दितीय पुरस्कार  फलटन सातारा येथिल दैनिक    पुढारीचे प्रतिनिधी प्रा नवनाथ गोवेकर   यांच्या '  कोरोनाने तोडली माणूसकी   आई मुलाजवळ त  मुलं आईजवळ  जाईनात ' या बातमीस  कै नागोबा विठ्ठोबा गुरमे  यांच्या स्मरनार्थ  पञकार  विनोद गुरमे यांच्या वतीने  दोन हजार रुपये रोख,  गौरव चिन्ह व गौरवपञ
*तृतिय पुरस्कार* 
  तेर जिल्हा उस्मानाबाद येथील दैनिक समय सारथीचे प्रतिनिधी  बापूराव नाईकवाडी यांच्या "  निराधार योजनेवर विधवांचा संसार " या बातमीस  प्रल्हाद येवरीकर  यांच्यावतीने यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपये, गौरवचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरवण्यात येणार

परिक्षक म्हणून साहित्यिक व चिञपट गीतकार  प्रा. रामदास केदार ,
पञकार व  बाल  साहित्यिक  रसुल दा. पठाण , पञकार सचिन शिवशेट्टे , रंगकर्मीचे उपाध्यक्ष सिध्दार्थ सुर्यवंशी, एल.डी. बेंबडे यांनी परिक्षणाचे काम पाहिले.
मान्यवरांच्या हस्ते लवकरच पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष भगिरथ सगर, बस्वेश्वर डावळे, सहसचिव सुधाकर नाईक, कोषाध्यक्ष बबन कांबळे, सदस्य नागनाथ गुट्टे, संग्राम पवार, मनोहर लोहारे, शेख अझरोद्दीन, शंकर बोईनवाड यांच्यासह पत्रकार बांधवांनी केले आहे.

विशेष सन्मान म्हणून 
न्यूज़ 18 लोकमत ,औरंगाबादचे ब्यूरो चीफ ,
सिद्धार्थ गोदाम यांचा सन्मान होणार असुन
ते मागील 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून पत्रकारितेत सक्रिय आहेत.
Etv ,सहारा समय,न्यूज 18 लोकमत सारख्या नावाजलेल्या वृत वाहिन्यात ते कार्यरत राहिले आहेत.
गोवा,दिल्ली, सोलापुर आणि औरंगाबाद या सारख्या प्रमुख ठिकाणी त्यांनी काम केले आहे.
ग्रामीण भागाचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न यावरील त्यांची पत्रकारिता कायमच चर्चेत असतात. तर मागील चाळीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे वाढवणा बु. येथील भुमीपुत्र ज्येष्ठ पत्रकार अनंत पारसेवार यांना 'जीवनौरव' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments