मागील भांडणाचा राग मनात धरुन एकास जबर मारहाण
उदगीर : येथील शहर पोलिसांच्या हद्दीतील
भाजी मंडईतील एका खानावळीच्या समोरील रोडवर मागील भांडणाचा राग मनात धरुन लोखंडी चाकुने एका तरुणास मारुन जखमी केले असल्याची घटना परवा घडली.
घटनास्थळी उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे, पोलीस उपनिरीक्षक शहादेव खेडकर, पोलीस उपनिरीक्षक देवानंद फडेवार यांनी भेट दिली. जखमी तरुणावर लातूरच्या जिल्हा रूग्णालयात उपचार चालु आहेत.
यावरुन जखमी तरूणाच्या मामाने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मैनोद्दीन शफी शेख यांच्या भाच्यास मागील भांडणाचा राग मनात धरुन आरोपी अशोक अमृतराव निलंगकर रा.गवळी गल्ली याने मारहाण केल्याप्रकरणी आरोपीविरुध्द सीआर नं ३३९/२१ क ३०७, ५०४, ५०६, भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शहादेव खेडकर हे करीत आहेत.
0 Comments