प्राचार्य व्ही.एस.कणसे यांना राष्ट्रपिता महात्मा फुले राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक प्राध्यापक पुरस्कार प्रदान
उदगीर : येथील विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील प्राचार्य व्ही.एस.कणसे यांेना त्यांच्या शैक्षणीक व सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने दिला जाणारा २०२०-२०२१ चा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत सत्यशोधक प्राध्यापक पुरस्कार बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांचे हस्ते देवून सन्मानीत करण्यात आले. प्रोटानचे तिसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन सोलापूर येथे भरले होते त्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी प्रोटॉनचे राष्ट्रीय प्रभारी प्रा.गोरखनाथ वेताळ, राज्यसचिव प्रा.डॉ. सिध्दार्थ कांबळे, मुख्य संयोजक प्रा.मोहन मिसाळ यांची उपस्थिती होती.
प्राचार्य व्ही.एस.कणसे याना यापूर्वी कै. विलास भोसले मित्रमंडळाचा २०१२ चाआदर्श शिक्षक पुरस्कार, इ.एच.एफ.संघटना नवी दिल्लीचा २०१५ चा नॅशनल अवार्ड, नवी दिल्लीचा २०१६ चा राष्ट्रीय शैक्षणिक अवार्ड काव्यमित्र संस्था पुणेचा महात्मा फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, २०१६ चा मदत संघटना नागपूरचा छ. शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार, परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद चा २०१७ चा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, श्री.जयभवाणी भक्तगण व सांस्कृतिक कलामंडळ रांझणी ता.पंढरपूर जि.सोलापूरचा २०१८ चा राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार यासह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


Post a Comment