GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

दावणगाव येथे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

दावणगाव येथे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

मानवता विकास प्रतिष्ठानच्या पुढाकारातुन गाव स्वच्छ व निर्मळ ...
उदगीर :  तालुक्यातील मौजे दावणगाव येथे मानवता विकास प्रतिष्ठानच्या वतीने २ दिवस ग्राम स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण दावणगाव गाव "स्वच्छ व निर्मळ" करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थांना रोगराई होऊ नये म्हणून नाल्या साफ करुन इतरही कचरा उचलण्यात आला. तसेच फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले .
यावेळी प्रतिष्ठान व गावातील तरूणांच्या वतीने श्रमदान करून गाव स्वच्छ करण्यात आले.  

दि. २८ नोव्हेंबर रोजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील पाटोदा - औरंगाबाद याचे सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदीर सभागृह दावणगाव येथे जाहीर व्याख्यान ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात कोरोना काळात कोरोना योध्दे म्हणून  उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार व गावातील ज्या तरूणांनी छोटे मोठे उद्योग व्यवसाय चालू केले आहेत त्यांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आले. 
या कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच, चेअरमन, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते मानवता विकास प्रतिष्ठानच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी धामणगाव चे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक मा. अॅड भद्रशेट्टे निळकंठ, व्हा.चेअरमन युवा उद्योजक धनाजी मुळे, डाॅ. सतीश भंडे, प्रकाश साखरे  उमाजी मूळे, किशनराव बिरादार, पांडुरंग फुले, प्रा. वागंबर कांबळे, अनिल सनगले,, दिलीप भंडे, रफीक बागवान, रमेश जाधव, सतीश हुरुसनाळे, पुंडलीक भोळे, राजकुमार भंडे, चक्रधर भंडे,विश्वभंर भंडे, मारोती भंडे ,प्रभुदास मोहीते आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments