जनसामान्यांशी बांधिलकी कायमची - ना.संजय बनसोडे
निडेबनच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही
उदगीर : जनतेच्या आशिर्वादाने मिळालेली आमदारकी व मंत्रीपद हे सामान्यांच्या सेवेसाठी आहे,विकासाच्या प्रश्नांना अग्रक्रमाने सोडविले असून जनसामान्यांशी कायम बांधील असल्याचे राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.निडेबन येथील सिद्धीविनायक नगर येथील सिद्धीविनायक मंदिराचे भूमीपजनानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर होते,प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ समाजसेवक रमेश अंबरखाने,पंचायत समितीचे सभापती प्रा.डॉ .शिवाजीराव मुळे, माजी सभापती बापूसाहेब राठोड, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड, सचिव सिध्दार्थ सुर्यवंशी, संग्राम पवार, संगम पटवारी, सामाजिक कार्यकर्ते मनोज बेल्लाळे,उपसरपंच फैयाज अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी ना.बनसोडे यांच्या हस्ते सिद्धीविनायक मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले."निडेबन हे उदगीर शहराचे वेगाने विकसित होणारे उपनगर असून येथील विकासकामांकडे लक्ष देण्याची गरज आहे.निडेबनच्या विकासासाठी दोन वर्षात मोठा निधी दिला असून यापुढील काळात निधी देऊन निडेबनचा विकास प्राधान्याने केला जाईल अशी ग्वाही ना.बनसोडे यांनी दिली.सिद्धीविनायकमंदिराच्या सामाजिक सभागृहासाठी पंधरा लक्ष रूपयाचा निधी त्यांनी घोषित केली.भावनिक प्रश्नांपेक्षा आता विकास महत्वाचा असून यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना.बनसोडे म्हणाले. ब्राम्हण समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली.माणसाला आत्मिक समाधान देण्याचे कार्य प्रार्थनास्थळांमधून होते,प्रगतीची क्षितिजे आपण गाठत असलो तरी श्रद्धास्थानेही महत्त्वाची आहेत,ती आपल्याला सन्मार्गावर ठेवतात असे मत बस्वराज पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले.रंगकर्मी प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेती श्रावणी गुडसूरकर हिला यावेळी पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन ना.बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रुपा बासरकर यांचा ,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर निवड झाल्याबद्दल धनंजय गुडसूरकर यांचा ना.बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. माजी सभापती बापूसाहेब राठोड यांचाही यावेळी भाषण झाले.प्रा,सिद्धेश्वर पटणे यांनी सुत्रसंचालन तर दिगंबर देशपांडे यांनी आभार मानले.
0 Comments