प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांना सत्यशोधक गणुजी शिवाजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार
उदगीर : समतावादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य आणि मुक्ता फौंडेशन ,कोल्हापूर तर्फे दिला जाणारा २०२१ चा अत्यंत सन्मानाचा सत्यशोधक गणुजी शिवाजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार उदगीर येथील कवी तथा सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांना राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे प्रा.डॉ .मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते वैज्ञानिक डॉ. डी .पी.साबळे,प्रा.डॉ. प्रतिमा अहिरे,सभापती कोमल सरदार मिसाळ आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यांच्या आजवरच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनी या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. कवी प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर हे शिक्षक साहित्य संघाचे मराठवाडयाचे विभागीय अध्यक्ष असून त्यांचे दुरावा, अविरत, कार्यकर्ता,दिशांध नायक,आहे तसेच आहे ईत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. शिवाय "आळ आणि काळ " या बहुचर्चित कथासंग्रहामुळे महाराष्ट्रास ते सुपरिचित आहेत.त्यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, शिक्षक साहित्य संमेलन, समतावादी साहित्य संमेलन, अशा अनेक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी,वक्ते म्हणून सहभाग राहिलेला आहे. आकाशवाणी परभणी केंद्रावरून त्यांचे कवितेचे आणि विविध विषयांवरील व्याख्यानाचे कार्यक्रम अनेकदा झालेले आहेत.
आत्तापर्यंत त्यांना दलित साहित्य अकादमी दिल्लीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे मंगळवेढयाचा मसाजी शिवशरण उत्कृष्ट कथालेखन पुरस्कार ,बडोदे वाङ्मय पुरस्कार, महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, अंकुर वाङ्मय पुरस्कार, विंदा काव्यलेखन पुरस्कार, महाराष्ट्र कविरत्न पुरस्कार, दै.एकमत उत्कृष्ट कथालेखन पुरस्कार, महात्मा कबीर समता परिषद सन्मान पुरस्कार इत्यादी बावीसहून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.
लेखक प्रा . हंडरगुळीकर यांना हा अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक कार्यगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील,डॉ.दादा गोरे,प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के ,रामचंद्र तिरुके, विलास सिंदगीकर,प्रा.डॉ. अमोल महापुरे , प्रा.डॉ. अनंता सूर,प्रा.डॉ. सोमनाथ कदम,ज्येष्ठ साहित्यिक दिगंबर कदम,प्रा.
डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे ,प्रा.डॉ .व्यंकटराव सूर्यवंशी ,ज्येष्ठ समीक्षक डॉ. जगदीश कदम,जयदीप सोनखासकर,डी. बी. जगतपुरिया,डॉ. भास्कर बडे,धनंजय गुडसुरकर ,प्रा.डॉ.मारोती कसाब, प्रा.रामदास केदार,संजय घाडगे,अंबादास केदार,प्राचार्य बी. एम.जाधव यांच्यासह उदगीर-जळकोट परिसरातील साहित्यप्रेमीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 Comments