माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे यांना लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण पुरस्कार प्रदान
उदगीर : नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. उषाताई कांबळे ( सोनकांबळे ) यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा लातूरच्या वतीने दिला जाणारा राजकीय व सामाजिक जीवनात महिलांच्या उन्नती करीता वैशिष्टयपूर्ण कार्य केल्याबद्दल त्यांना कर्तृत्वान महिला म्हणून लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण पुरस्कार नुकताच दयानंद सभागृह लातूर येथे झालेल्या पत्रकारांच्या मराठवाडा परिषदेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . श्रीमती उषाताई कांबळे व डॉ. गोविंद सोनकांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला . या वेळी पत्रकार संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देढे तसेच पत्रकार संघाचे महाराष्ट्र , मराठवाडय़ातील पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
0 Comments