GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेवून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा : ना संजय बनसोडे

सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेवून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा : ना संजय बनसोडे

जळकोट :  सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून त्या अडचणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
जळकोट तालुक्यात शहर व ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत यामुळे हा तालुका गेली अनेक वर्षे विकासा पासून वंचित आहे , मागे काय झालं ते न पाहता यापुढे आपण सर्वांनी मिळून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करावे व त्यांच्या समस्या जाणून घेवून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा व स्वच्छता पर्यावरण भूकंप पुनर्वसन रोजगार हमी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी जळकोट येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
      यावेळी बोलताना ते म्हणाले की , हे सरकार सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करते, आजही सर्वसामान्य लोकांच्या अनेक समस्या आहेत, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील लोकांच्या भेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घ्या व त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर,  तालुकाध्यक्ष आगलावे, विठ्ठल चव्हाण, रामराम राठोड आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments