GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

बलात्कार करुन धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

बलात्कार करुन धमकी देणाऱ्या आरोपीला अटक 
आरोपीला कठोर शिक्षा होईल : उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जाॅन बेन

उदगीर : दोन वर्षापासून जबरदस्ती करुन बलात्कार करणाऱ्या आरोपीला अखेर उदगीर शहर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. 
आरोपी हा मुख्य जळकोट तालुक्यातील गुत्ती या गावचा असुन सध्या वास्तव्यास उदगीर शहरात राहत होता.
एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचा रूबाब करत एका विवाहित महिलेवर गेल्या दोन वर्षापासून दामदाटी, धमकी देऊन जबरदस्तीने बलात्कार करून अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात परवा रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जाॅन बेन यांनी सांगितले की, आरोपी हा मुळचा रा.गुत्ती ता.जळकोट येथील असुन सध्या तो  उदगीर शहरात राहत होता. एका महिलेवर गेल्या दोन वर्षापासून दाब धमकी देऊन सातत्याने बलात्कार केला, पोलिसात तक्रार देते म्हटल्यानंतर या महिलेस काही आरोपींकडून धमकी देण्यास लावले. अखेर या बलात्कार पिडीत महिलेने शुक्रवारी शहर पोलिस ठाणे गाठले व झालेली हकीकत सांगितली.
आरोपीने फिर्यादीस दिलेल्या धमकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ऐकविले. तिच्या फिर्यादीवरून सदर आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू असून पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी कायद्यानुसार दोषीला शिक्षा होईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जाॅन बेन यांनी सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments