GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणासाठी ७५ लाख तर यलम समाजासाठी २ कोटीचा निधी मंजूर

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणासाठी ७५ लाख तर यलम समाजासाठी २ कोटीचा निधी मंजूर

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पुढाकारातुन २.७५ कोटी रुपयाचा निधी


उदगीर : येथील महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नविन पुतळा बसविणे व पुतळा सुशोभिकरण करण्यासाठी ७५ लाख रुपयाचा निधी ना.संजय बनसोडे यांनी मंजूर केला असुन मागच्या आठवड्यात यलम समाज बांधवांनी त्यांच्या समाजाच्या सभागृहसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली होती. यलम समाजबांधवांच्या मागणीचा विचार  ना.बनसोडे यांनी तात्काळ करुन यलम समाजासाठी २ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असल्याचा जी.आर. काल निघाला असुन लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.
उदगीर मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी सतत कार्य तत्पर असणारे व मंत्री असूनही मतदार संघासाठी ३ दिवस तळठोकुन असणारे ना.संजय बनसोडे यांच्या कार्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत असुन विरोधकांना खडेबोल बोलून न दाखवता आपल्या कार्यातून जनतेची सेवा करुन आपल्या आमदारकीची व मंत्री पदाची ओळख ना.संजय बनसोडे यांनी करुन दिली आहे. 
मागील काळात विविध समाजाच्या सभागृहसाठी कोट्यावधीचा निधी ना.बनसोडे यांनी मंजूर करून दिला होता. आता यलम समाजासाठी ही २ कोटी रुपयाचा निधी मंजूर करुन विकास कामात आणखी भर पडली असल्याने यलम समाज आनंदी आहे. बौद्ध समाजबांधवांची मागणी लक्षात घेवुन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नविन पुतळा बसविणे व पुतळ्याचा परिसर सुशोभित करण्यासाठी ७५ लाख रुपयाचा निधी मंजूर केल्याने सर्व समाजबांधवासह उदगीर मतदार संघातील जनतेतून ना.संजय बनसोडे यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments