GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

खाजगी लाईनमनचा मृत्यू झाल्याने वाढवणा पोलीसात गुन्हा दाखल


खाजगी लाईनमनचा मृत्यू झाल्याने वाढवणा पोलीसात गुन्हा दाखल

उदगीर : तालुक्यातील नळगीर परिसरात 3 ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास प्रशांत पोतदार यांच्या शेतात खाजगी लाईनमन अविनाश शेरे हे विद्युत काम करत असताना त्यांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या विद्युत खात्यातील अभियंतासह अन्य दोघांवर वाढवणा पोलिसात मयत अविनाश शेरे यांच्या भावाच्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीसात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वाढवणा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
श्यामसुंदर लक्ष्मण जाधव,गुत्तेदार पंकज चांदोरे व कनिष्ठ अभियंता रोहित तरटे या तिघांच्या सांगण्यावरून खाजगी लाईनमन अविनाश माधवराव शेरे यांना नळगीर परिसरातील साईडच्या विद्युत पोलवर सोडून काम करण्यास भाग पाडले असता अविनाश शेरे यांना शॉक लागून ते मरण पावले या वरून अविनाश शेरे यांचे बंधू संतोष माधवराव शेरे रा.नागलगाव ता.उदगीर  यांच्या फिर्यादीवरून अविनाश यांना विद्युत पोल वर चढून काम करण्यास भाग पाडले म्हणून संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुरन व कलम CRNO165/2021 कलम 304,34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे सह पोलिस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जोंधळे हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments