लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा अनेक क्षेत्रात नावलौकिक - राज्यमंत्री संजय बनसोडे
शैक्षणिक क्षेत्राला दिशा व मार्गदर्शनाचे कार्य लातूर जिल्ह्याने केले
लातूर : लातुर जिल्हा म्हणजे गुणवंताची खाण आहे. आज महाराष्ट्रात व देशात आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविले आहे. डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासनाचे अधिकारी, संशोधक अशा विविध क्षेत्रांत आपल्या विद्यार्थ्यांनी नाव कमाविले आहे. मागिल कित्येक वर्ष महाराष्ट्रात नव्हे तर देशात लातुर पॅर्टनचा बोलबाला आहे. शैक्षणिक क्षेत्राला दिशा व मार्गदर्शनाचे कार्य लातुर जिल्हयाने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी काल जळकोट महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्यातीने आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी तहसिलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.उध्दव भोसले, मन्मथअप्पा किडे,अर्जून आगलावे, संतोष तिडके, मारुती पांडे, बालाजी ताकबिडे, शिवाजीराव साखरे, उस्मान मोमीन, धर्मपाल देवशेटे, बाबुराव जाधव, चंदन नागरगोजे, एम.जी. मोमीण, व्यंकटरावे केंद्रे, सत्यवान दळवे, श्रीमती सुनंदाताई धर्माधीकारी, संग्राम हसोळे, व्यंकटराव पवार, संपतराव शिंगाडे, गजानन दळवे, पाशा शेख, दिलीप कांबळे, ज्ञानेश्वर नकुरे, भरत कुंद, महेश धुळशेटे, धनंजय गुडसुरकर, विलास सिंदगीकर आदिंची उपस्थिती होती.
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, शिक्षणाची गंगा सामान्य माणसाच्या दारांपर्यंत पोहचिवण्याचे कार्य येथील शिक्षक करीत असतात. समाजातील कोणताही घटक शिक्षणापासुन वंचित राहु नये यासाठी असे उपक्रम कायमच उपयोगी पडतात. लातुर जिल्हयात राबविण्यात येणाऱा “बाला हा शैक्षणिक उपक्रम म्हणजे इमारत एक शैक्षणिक साधण”. हा उपक्रम म्हणजे शिक्षण हे मनोरंचक करुन सोप्या भाषेत सांगणे होय. शाळेची इमारत ही आपणांस विज्ञानांची, गणिताची, इतिहासाचे धडे देणे ही कल्पनांच मुळी आनंद देणारी आहे. हा उपक्रम राबविणारी लातुर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आहे. हा उपक्रम लातुर जिल्हयातील 500 शाळेत राबविण्यात येत आहे. अशा योजना, उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत याचा आनंद आहे. उदगीर-जळकोट येथील पायाभुत (रस्ते, इमारत) विकास कामे करण्यात येणार आहेत. या सोबतच येथील नागरिकांचा जीवनमान स्तर उंचावला पाहिजे यासाठी पण आपण प्रयत्न करीत आहोत. जीवन जगण्याचा स्तर उंचविण्यासाठी उत्तम शिक्षण महत्त्वाचे आहे. यासाठी अशा उपक्रमांची आणि हे उपक्रम उत्तमरित्या राबविणाऱ्या गुरूजनांची गरज आहे असेही ते म्हणाले.
एक चांगला समाज निर्माण करण्यामध्ये शिक्षकांचा सर्वात मोठा वाटा असतो. आई-वडीलांसोबतच शिक्षक आपल्या जीवनात मार्गदर्शक व दिशा दर्शकांची भुमिका बजावतात. कोरोना काळात ही शिक्षकांनी घरोघरी शिक्षण पोहोचवले आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक काळात विविध माध्यमांद्वारे आपले प्रतिभावंत शिक्षक ज्ञानगंगा शेवटच्या घटकांतील मुलांपर्यंत पोहोचवत आहेत. “2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर” या कालावधीत “थँक्स अ टीचर” हा उपक्रम शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. आपण सर्वांनी या उपक्रमात भाग घ्यावा. शहरातील दहावी, बारावीच्या परिक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला आहे त्या विद्यार्थ्याचे पण अभिनंदन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्यातीने वतीने जळकोट परीसरातील बाला उपक्रमांतर्गत उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या शाळेमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments