शिवाजी महाविद्यालयातील प्रा. विष्णू पवार यांना पीएच डी. प्रदान
उदगीर : येथील शिवाजी महाविद्यालयातील प्रा. विष्णू पवार यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने "महाराष्ट्रातील महाविद्यालयीन ग्रंथपालाचा सामाजिक ,आर्थिक व व्यावसायिक स्थितीचा अभ्यास'' या विषयावर पीएच .डी .पदवी प्रदान केली आहे .त्यांना संत जनाबाई महाविद्यालय, गंगाखेड येथील डॉ. उद्धव आघाव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांचा शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव, डॉ. उद्धव आघाव डॉ.जगदीश कुलकर्णी ,डॉ. हंबर्डे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील संशोधन कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.प्रा. विष्णू पवार हे शिवाजी महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध विविध नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचे आजपर्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. ते महाविद्यालयात आयक्यू ए. सी समन्वयक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. ते एक क्रियाशील ग्रंथपाल म्हणून विद्यापीठ परिसरात सुपरिचित आहेत. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना पीएच .डी .पदवी प्रदान झाल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी श्री अरविंद पाटील एकंबेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव उपप्राचार्य डॉ. एस.व्ही.जगताप डॉ. आर. एम. मांजरे, प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments