GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. विजयकुमार जाधव यांचा वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये समावेश

शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. विजयकुमार जाधव यांचा वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये समावेश

 उदगीर : अमेरिकेतील अल्पर डोझर सायंटिफिक इंडेक्सने वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021 जाहीर केली आहे. त्यामध्ये शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विजयकुमार जाधव या संशोधक प्राध्यापकाचा समावेश करण्यात आला आहे.या रँकिंगमुळे जागतिक स्तरावर संशोधक म्हणून त्यांना मानाचे स्थान मिळाले आहे. डॉ. जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक म्हणून सर्व परिचित आहेत . यापूर्वी त्यांनी आयर्लंड येथे पोस्ट डॉक्टर फेलोशिप या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून संशोधन कार्य केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 69व्या नोबेल पारितोषिक विजेत्या परिषदेसाठी लिंडाऊ जर्मनी यांच्या वतीने जगभरातील 550 तरुण संशोधकांमध्ये त्यांची निवड झाली आहे. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मुरत अल्पर व प्रा.सिहान डोजर यांनी मागील पाच वर्षातील एच इंडेक्स, आयटेन इंडेक्स आणि सायटेशन स्कोअर या बाबी विचारात घेऊन वर्ल्ड रँकिंग श्रेणी ठरविली आहे.अर्थशास्त्र, विधी,तत्वज्ञान, कृषी ,कला, वाणिज्य व्यवस्थापन,सामाजिकशास्त्र,वैद्यक, आरोग्य विज्ञान व इतिहास यासह 256 उपशाखा तील संशोधकांनी नामांकनात अव्वल स्थान मिळविले आहे. तसेच यापूर्वी डॉ.जाधव यांनी साऊथ कोरिया, इस्राईल,इटली व चायना आदी देशांमध्ये जाऊन संशोधन कार्य केले होते. त्यांच्या या प्रयत्नातून युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क, आयर्लंड आणि युनिव्हर्सिटी ऑफ कँपिनास ब्राझील सोबत शिवाजी महाविद्यालयाचा संशोधनात्मक करार देखील झाला आहे.त्यांचे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विज्ञान संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले आहेत. अशा या गुणी संशोधकाच्या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी अरविंद पाटील एकंबेकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव व उपप्राचार्य डॉ. एस.व्ही जगताप, डॉ.आर.एम. मांजरे,प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी व मित्र परिवारासह त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments