GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

आंतरजातीय विवाह ही काळाची गरज - जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे

आंतरजातीय विवाह ही काळाची गरज - जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे


 लातूर : जातीय भेदाभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण होण्यासाठी आंतरजातीय विवाह आज काळाची गरज असल्याचे मत लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी  लातूर जिल्हा परिषद येथे समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित विवाह प्रोत्साहन योजना 2020 - 21 मधील आंतरजातीय विवाह केलेल्या पात्र जोडप्यांना अनुदान धनादेश वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने आज आंतरजातीय विवाह केलेल्या 16 जोडप्यांना एका कार्यक्रमात अनुदान धनादेश  वितरीत करण्यात आले. 
यावेळी मान्यवरांनी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना अनुदानाचा धनादेश, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाही दिल्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने चालू आर्थिक वर्षात अशा 80 लाभार्थ्याना अनुदान वितरीत करण्यात आल्याचे सांगून या जोडप्यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिल्याचे लातूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
या कार्यक्रमास जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,उपाध्यक्ष सौ.भारतबाई सांळुके, , समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे,कृषी सभापती गोविंद चिलकूरे  जि.प.सदस्य डॉ.संतोष वाघमारे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनिल खमितकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जवळगेकर कार्यकारी अभियंता गंगथडे व अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम कोरे यांनी केले तर आभार शाहुराज कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments