GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

ग्रामीण प्रशासनाचा कणा असणारे तलाठी कार्यालय आधुनिक व सुसज्ज होणार उदगीर तालुक्यातील 29 तलाठी व 4 मंडळ अधिकारी कार्यालया साठी 10 कोटीचा निधी मंजूर

ग्रामीण प्रशासनाचा कणा असणारे तलाठी कार्यालय आधुनिक व सुसज्ज होणार

 उदगीर तालुक्यातील 29 तलाठी व 4 मंडळ अधिकारी कार्यालया साठी 10 कोटीचा निधी मंजूर

मुंबई : शेतकऱ्यांच्या सातबारा पासून ते जमिनीच्या 8 अ ,रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न, शेतीचा फेरफार अशा इतर अनेक कागदपत्रासाठी तलाठी कार्यालयात सामान्य माणसाला जावे लागते शेतकऱ्यांना, नागरिकांना या कार्यालयातून उत्तम प्रकारची सेवा मिळावी यासाठी गावातील तलाठी कार्यालय सुसज्ज व आधुनिक असावे असा शासनाचा मानस आहे याचाच भाग म्हणून उदगीर येथील 29 तलाठी कार्यालय व 4 मंडळ अधिकारी  कार्यालयासाठी  शासनाने 10 कोटीचा निधी मंजूर करून दिला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आज दिली आहे.
 ग्रामीण प्रशासनाचा कणा असणारे सामान्य नागरिकांच्या अत्यंत जवळचे व गरजेचे हे तलाठी कार्यालय सुसज्ज असावे आधुनिक सोयींनी युक्त ,प्रशस्त असणे आवश्यक असते उदगीर तालुक्यात विविध विकास  कामे सुरू आहेत यात रस्ते, पूल, प्रशासकीय इमारत यासोबतच ग्रामीण प्रशासन गतिमान करण्यासाठी व ग्रामीण नागरिकांना उत्तम सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा सुसज्ज इमारतीची आवश्यकता आहे उदगीर तालुक्यात  या सुसज्ज इमारती उभारण्यात याव्यात यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात आला. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला यामुळेच शासनाने आज या इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

 यात नागलगाव, नळगीर, देवर्जन, तोंडार, या चार मंडळाचा समावेश करण्यात आला आहे 
 तसेच निडेबन, सोमनाथपूर, बनशेळकी, नागलगाव, तोंडचिर,नळगीर कोंदळी अवलकोंडा, नावंदी गुडसुर, कासराळ, देवर्जन, भाकसखेडा, दावणगाव, शंभू उमरगा ,कुमठा, डिग्रज, करडखेल, लोहारा, हाळी ,हंडरगुळी ,किनी वाढवणा ,येणकी, रावणगाव ,धोंडीहिप्परगा, तोंडार ,डोंगरशेळकी, लोणी या गावाचा समावेश करण्यात आला आहे.
 या इमारती आधुनिक व सुसज्ज तसेच पर्यावरण पूरक असणार असून या इमारतीच्या बांधकामास त्वरित सुरुवात होणार असून यामुळे ग्रामीण प्रशासनाला गती येणार आहे  उदगीरच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडु दिला जाणार नाही अशी माहिती राज्याचे पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments