GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

प्रा. रामदास केदार यांना साहित्य अकॅडमीचा प्रथम पुरस्कार जाहीर


प्रा. रामदास केदार यांना साहित्य अकॅडमीचा
 प्रथम पुरस्कार जाहीर

   उदगीर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकँडमी लातूरच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड:मय पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून उदगीर येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा मराठी चित्रपट गीतकार प्रा.रामदास केदार यांच्या 'बालसाहित्य वाटा आणि वळणे ' या समीक्षा ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकँडमीचा उत्कृष्ट वाडःमय प्रथम पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती सचिव प्रकाश घादगीने यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे. 
   प्रा. रामदास केदार हे शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय वाढवणा येथे मराठी विषयाचे प्राध्यापक असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. यापुर्वी या ग्रंथास पुणे येथील अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेचा शंकर सारडा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे मराठवाड्याची आई, गळफास,घिसाड्याचं पोर, प्रायश्चित्त, पोखरून पडलेली माणसं, बीन बुडाची माणसं, बन्याची शाळा, गंप्या गुराखी, चिमणी चिमणी खोपा दे, पाऊस माझ्या मनातला, गुरुजींच्या कविता, कस्तूरी, शब्दांकुर, गावची जत्रा कारभारी सतरा, डोळ्यात दाटले पाणी, बैल दौलतीचा धनी इत्यादी ग्रंथ संपदा प्रकाशित झाली आहेत. बेला, प्रायश्चित्त, घुसमट, मैतर ,बिंधास जीवन या चित्रपटांच्या पटकथा व गीतलेखन केले आहे. लवकरच कोविड काळ संपल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याचे साहित्य अकँडमीने कळविले आहे. बालसाहित्य समीक्षा लेखनासाठीचा हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था सचिव चंदन पाटील तसेच प्राचार्य मुंजेवार वाय. के.,अध्यक्ष अँड. एस. एस.बोडके, बंकट पुरी, डॉ. संजय जमदाडे साहित्यिक संजय ऐलवाड, रसूल पठाण, बेंबडे लक्ष्मण, सिद्धार्थ सूर्यवंशी, 
विक्रम हलकीकर, अनंत कदम, अंकुश सिंदगीकर, सतिश नाईकवाडे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक, पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments