GS H

ब्रेकींग न्युज

6/recent/ticker-posts

मातृभूमीत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

मातृभूमीत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा 


 उदगीर :  येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालय, मातृभूमी नर्सिंग स्कूल, व कस्तुराबाई नर्सिंग स्कूल मध्ये ३४८ वा शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  यावेळी  राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले  छत्रपतीशिवरायांच्या कार्य   वियषयी आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रा. रणजित मोरे व प्रा बिभीषण मद्देवाड यांनी दिली.
 यावेळी मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी, संतोष जिरोबे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा बिभीषण मद्देवाड, प्रा सय्यद उस्ताद, प्रा. शिर्शिकर, प्रा. केंद्रे आदींची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments